पश्चिम #घाट हा भाग संवेदनक्षम क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथे प्राणी आणि वनस्पती यांच्या अनेक प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळून येतात. वाघ, आशियाई हत्ती, आणि रानकुत्रा यांच्या जगातील मोठ्या अधिवासक्षेत्रांपैकी एक , अशी पश्चिम घाटाची ओळख आहे. सध्या २०२० मध्ये वाइल्डलाइफ काँझर्व्हेशन ट्रस्टचे (WCT) संशोधक उत्तर पश्चिम घाटातील सुमारे ७,००० चौ. किमी क्षेत्रात वाघ, रानकुत्रा, अस्वल आणि बिबट्या या मांसभक्षी प्राण्यांचा अधिवास क्षेत्रातील वावर जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करत आहेत. #महाराष्ट्र वन विभागाच्या सहकार्याने, #WCT च्या संशोधकांनी मार्च २०२० पर्यंत सुमारे ४,००० चौ. किमी क्षेत्राचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. हा अभ्यास #वन्यजीव अधिवासांतील महत्वाचे #कॉर्रिडॉर्स संरक्षित ठेवण्याचा आणि इथल्या मांसाहारी प्राण्यांचे भक्ष्य असलेल्या (शाकाहारी) प्राण्यांची संख्या वाढवण्याचा दीर्घकालीन प्रयत्न आहे.
——————————————————————————————————————————————————————
Your donations support our on-ground operations, helping us meet our conservation goals.
——————————————————————————————————————————————————————